---Advertisement---
मुक्ताईनगर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात शिवसेनेच्या वतीने राजेंद्र वानखेडे यांची मुक्ताईनगर तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.या निर्णयामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले असून, शिवसेनेची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला अनुसरून आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, संबंधित नियुक्ती पत्रात वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या नियुक्तीमागे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, पक्षाची पकड अधिक मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन सुसज्ज ठेवणे हा मुख्य हेतू असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. राजेंद्र वानखेडे यांनीही पक्षाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.









