जळगाव सुवर्णनगरीत सोनं-चांदी पुन्हा महागलं; आजचे सोन्या-चांदीचे भाव काय? जाणून घ्या…!

---Advertisement---

 

सुवर्णनगरी जळगावमध्ये आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. सोन्याच्या भावात १ हजार ५०० रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर १ लाख ५३ हजार रुपयांवर पोहोचले असून जीएसटीसह हा भाव १ लाख ५७ हजार ५९० रुपयांवर गेला आहे. तर चांदीचे दर २ लाख ५७ हजार रुपयांवर पोहोचले असून जीएसटीसह चांदीचा दर २ लाख ६४ हजार ७१० रुपये इतका झाला आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही या सोन्या-चांदीच्या दरवाढीवर परिणाम झाल्याचे सोने तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या तणावाबाबत पुन्हा चर्चेचे संकेत दिल्याने जागतिक बाजारपेठेत चढ-उतार झाले असून त्याचा परिणाम शेअर बाजारासह सोन्या-चांदीच्या दरांवर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---