मुक्ताईनगरात कृषी विभागाचा मोठा दणका; बोगस खत साठेबाजी प्रकरणात गोडाऊन सील

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत एका नामांकित कृषी केंद्राच्या गोडाऊनवर धाड टाकून ते सील केले आहे.


राज्यात सुरू असलेल्या युरिया काळाबाजाराचा पर्दाफाश झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची होणारी लूट रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

भरारी पथकाने अचानक तपासणी करताना खतांच्या साठ्यात तफावत आणि संशयास्पद खत आढळून आले. यावेळी संबंधित खतांचे नमुने जप्त करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

तपासणीत दोष आढळल्यास संबंधित कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल. असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना दक्षता घ्यावी आणि कोणताही संशय आल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---