धुळे-सुरत महामार्गावर यावल-वापी एसटी बसचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली…!

---Advertisement---

 

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा एक मोठा अपघात झाला आहे. यावल येथून वापीकडे जाणारी एसटी बस (क्र. एमएच २० बीएल ३९२२) निमदरडा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने बसला धडक दिली. यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सदर बस यावल आगाराची असून अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण १९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक भिका तडवी आणि वाहक अमित तडवी यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत बसवरील नियंत्रण कायम ठेवले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य भीषण दुर्घटना टळली आणि सर्व प्रवासी सुखरूप वाचले आहेत. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघातानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना तत्काळ दुसऱ्या बसमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आले. त्यामुळे प्रवासात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातग्रस्त बस रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---