जळगाव, भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठी दिलासा; मुंबई ते रिवा दरम्यान धावणारी विशेष साप्ताहिक गाडी आता कायमस्वरूपी धावणार…!

---Advertisement---

 

जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई ते रिवा दरम्यान धावणारी विशेष साप्ताहिक गाडी आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली असून तिला ‘सुपरफास्ट’चा दर्जाही देण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ०२१८७/०२१८८ या विशेष गाडीला आता २०१५३/२०१५४ असा नवीन क्रमांक देण्यात आला आहे. त्यानुसार २०१५३ सीएसएमटी-रिवा साप्ताहिक सुपरफास्ट २४ एप्रिलपासून, तर २०१५४ रिवा-सीएसएमटी साप्ताहिक २३ एप्रिलपासून धावणार आहे.

गाडी क्रमांक २०१५३ ही प्रत्येक शुक्रवारी दुपारी १.३० वाजता मुंबई (सीएसएमटी) येथून सुटेल. त्यानंतर सायंकाळी ७.३८ वाजता जळगाव आणि ८.१५ वाजता भुसावळ येथे पोहोचेल. पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता ही गाडी रिवा येथे पोहोचणार आहे.
तर २०१५४ क्रमांकाची गाडी गुरुवारी दुपारी ३.५० वाजता रिवा येथून सुटेल. पुढील दिवशी पहाटे ४.०५ वाजता भुसावळ, ४.३५ वाजता जळगाव येथे पोहोचून दुपारी १२.२० वाजता मुंबईत दाखल होईल.

या गाडीला अप आणि डाऊन मार्गावर दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना या प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये एकूण २२ डबे असणार आहेत. यात एसी प्रथम, एसी द्वितीय, एसी तृतीय, स्लीपर आणि जनरल डब्यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---