वन विभागाची अनास्था : वागदर शिवरात वनराई खाक, भविष्यात वनवणवा रोखण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता

---Advertisement---

 

पिंपळनेर : पिंपळनेर परिसरातील वागदर शिवारात असलेल्या फॉरेस्टच्या डोंगराला मंगळवार सायंकाळनंतर भीषण आग (वनवणवा) भडकल्याची घटना घडली. या आगीत डोंगरावर वृक्षारोपण योजनेंतर्गत नव्याने उगवलेली छोटी झाडे आणि वनसंपदा जळून खाक झाली आहे. विशेष म्हणजे, या वनवणव्यासंदर्भात वनविभागाला माहिती देऊनही त्यांच्याकडून आपत्कालीन उपाययोजनांसंदर्भात कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

साक्री तालुक्यात पिंपळनेर नजीक वनविभाग क्षेत्र असून यात वागदर शिवारातील डोंगरावर मंगळवार नंतर अचानक आग लागल्याचे स्थानिक शेतकरी यतीश गांगुर्डे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांना दिसले. सायंकाळच्यसा सुमारास वाऱ्याचा वेग पहाता लहान असलेल्या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले आणि बघता बघता डोंगराचा मोठा भाग आगीच्या विळख्यात सापडला. या आगीत पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून, उगवलेली संवर्धन केलेली लहान रोपे पूर्णपणे जळून गेली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना साक्री विभागाशी संबंधित शेतकऱ्यांनी फोनद्वारे या आगीची माहिती दिली. उन्हाळयाच्या दिवसात वनवणव्याची शक्यता लक्षात घेता आग विझवण्यासाठी वन विभागाने माहिती मिळताच उपाययोजना करीत हालचाली करणे अपेक्षित होते. मात्र संबंधीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती देणाऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. माहिती देवूनही वन विभागाच्या या उदासिन भूमिकेमुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि निसर्गाचे मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी वनविभागावरील संताप आणि खेद व्यक्त केला.

वन विभाग गांभीर्याने घेत नाही, शेतकऱ्यांचा आरोप

डोंगरावर दरवर्षी वनवणवा लागण्याच्या घटना घडत असतात, मात्र वन विभाग कर्मचारी याकडे गांभीयनि पाहत नाहीत. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जागरूक नागरिक म्हणून आम्ही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देतो, पण जर संबंधीत प्रशासनच कर्मचारी ढिम्म असतील, तर या वनसंपदेचे रक्षण होणार कसे?” असा प्रश्न माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वन कर्मचाऱ्यांना फोन केला, पण त्यांच्याकडून मिळालेली प्रतिक्रिया अत्यंत निराशाजनक होती. त्यांच्या या वेळकाढू धोरणामुळे डोंगरावरील शेकडो लहान मोठी झाडे जळून खाक होतात. या घटनेनंतर आता तरी वरिष्ठ वन अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करतील का? आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत असे या भागातील शेतकरी विचारणा करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---