धुळे कृषी कार्यालयाचा पर्यवेक्षकास 28 लाच भोवली; एसीबीने केली अटक, लाचखोरांमध्ये खळबळ….!

---Advertisement---

 

धुळे तालुक्यातील पिंपरी तालुका कृषी कार्यालयाचे पर्यवेक्षक कैलास रामदास तेले (रा.अक्षय कॉलनी, गोंदूर रोड, धुळे) यांना 28 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ठिबक साहित्याची मोका जोडणी करून त्याचे फाईल मंडळ कार्यालयास पाठवण्याच्या मोबदल्यामध्ये पर्यवेक्षक कैलास तेले यांनी 28 हजारांची लाच मागितली होती.

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील तक्रारदाराचे ठिबक सिंचन साहित्य विक्रीचे रजिस्टर दुकान आहे, याशिवाय धुळे तालुक्यातल्या शिरूड येथे देखील त्यांची शाखा आहे. दरम्यान शिरूडच्या दुकानातून परिसरातील शेतकरी शासकीय योजनेतून ठिबक सिंचन साहित्य खरेदी करतात व या योजनेचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी डीबीटी पोर्टलवर शेतकरी हे ऑनलाइन अर्ज करतात. त्यामुळे सिंचन साहित्य खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन साहित्याचे जोडणी केल्याचे पळताळणी अर्थात (मोका तपासणी) करण्याचे काम पर्यवेक्षक कैलास तेले यांच्याकडे आहे.

दरम्यान ही पडताळणी करून त्याचे फाईल ही मंडळ अधिकाऱ्यांकडे लॉगिन साठी पाठवल्यानंतर तक्रारदाराच्या दुकानात येत मुका तपासणी केल्याच्या मोबदल्यामध्ये 28 हजारांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने तक्रारदानाने धुळे एसीबी कडे प्रत्यक्ष तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण पडताळणी करून हा सापळा रचण्यात आला.

धुळे शहरातल्या जय हिंद चौकात तक्रारदाराला लाच देण्यासाठी कृषी पर्यवेक्षक केले यांनी बोलवले होते. यावरून एसीबीच्या पथकाने सांभाळ रचला आणि रात्री उशिरा लाच स्वीकारताना पर्यवेक्षक दिले यांना अटक झाली आहे.

धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेशमा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने हा सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---