‘तुझ्या मुलीकडून शरीरसुख दे’ म्हणताच बापाचा संताप अनावर, कुऱ्हाड व रॉडने 16 वार करून पोत्यात भरून पुलावरून फेकलं….!

---Advertisement---

 

घरी कोणी नसल्याची संधी साधून नवीनने राहुल कडे त्याच्या मुलीच्या शरीर सुखाची मागणी केली, यावरून राहुलला संताप आला आणि दोघांमध्ये तीव्र वाद झाला.

आपल्या मुलीच्या शरीर सुखाची मागणी केल्याने अचरज टॉवर मधील हॅप्पी स्टे हॉटेल चा मालक राहुल सुनील शाहू (वय 38 रा. झिंगाबाई टाकळी) याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह हा पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

आरोपीचे नाव नवीन पंजाबराव पुंडकर (वय 42 रा.दुर्गाजी नगर, नारा) असे आहे. नवीनचे या अधिक पेट शॉप होते. या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत राहुल हा व्याजाने पैसे द्यायचा. 2020 मध्ये नवीन ने त्याच्याकडून 50,000 घेतलेले होते. वेळोवेळी राहुलला नवीन ने त्याचे काही पैसे परत केले. मात्र त्यानंतरही राहुल हा नवीन चा पैशांसाठी छळ करत होता व त्याला धमकी देत होता.

हेही वाचा, आधी बिर्याणी खाल्ली, मग कलिंगड खाल्लं, आणि काही तासातच एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू…!

एके दिवशी रात्री राहुल हा नवीन कडे पैसे घेण्यासाठी कामठी मार्गावर गेला. त्या ठिकाणी तो नवीन च्या घरी गेला आणि त्याच्या घरी कोणी नव्हतं म्हणून त्याने त्याच्या मुलीच्या शारीरिक सुखाची मागणी त्याच्याकडे गेली. त्यामुळे नवीन हा भयानक संतापला. राहुल आणि नवीन मध्ये तीव्र वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्याने नवीन ने कुऱ्हाड व रॉडने राहुलवर 16 गंभीर असे वार केले व त्याची हत्या केली.

राहुलची हत्या केल्यानंतर बॉडी घरात ठेवून आरोपी नवीन ई रिक्षा घेऊन बाहेर गेला आणि रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन पोते घेऊन तो घरी आला त्यामध्ये त्यांनी मृत राहुल चा मृतदेह पोत्यात भरला त्यानंतर ई-रिक्षाने तो नारा परिसरातील एका पुलावर गेला आणि पोत्यात भरलेली बॉडी त्याने पुलावरून खाली फेकली त्यानंतर तो पुन्हा घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने रक्ताचे डाग पुसले. त्यानंतर राहुलच्या हत्येची ही घटना उघडकीस आली.

याबाबत जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपयुक्त डॉ. संदीप पखाले, सहाय्यक पोलिस आयुक्त सत्यवीर बंडीवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरू केला. मृतदेह भरलेल्या पोत्यावर पेट शॉप चे लेबल दिसल्याने त्यावर चौकशी केली असता पत्ता देखील होता. पत्ता वाचून पोलीस पथक हे दुकानाजवळ गेले ते दुकान बंद होतं. पोलिसांनी अधिक चौकशी केली त्यानंतर दुकान हे नवीन असल्याचे समोर आलं त्यानंतर पोलिसांनी नवीन च्या घरी अचानक धाडं टाकली व त्याला अटक केली. त्यानंतर नवीन ला न्यायालयात हजर केल्याने त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---