---Advertisement---
जळगाव : येथील मायादेवी नगरातील रोटरी भवन मध्ये झालेल्या भारत विकास परिषद जळगाव शाखेच्या अध्यक्षपदाची अनिरुद्ध कोटस्थाने यांनी तर सचिव म्हणून भूषण गुरव व कोषाध्यक्षपदाची विशाल देशमुख यांनी दायित्व ग्रहण सोहळ्यात सूत्रे स्वीकारली. यावेळी नूतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष व माजी प्राचार्य अनिल राव यांची तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रीम इंडस्ट्रीजचे व्हाईस प्रेसिडेंट सुरेश मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक उज्वल चौधरी यांची आणि भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्राचे सेवा गतीविधी प्रमुख तुषार तोतला, प्रांताध्यक्ष विशाल चोरडिया यांची विशेष उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य अनिल राव यांनी भारत विकास परिषदेचे संघ प्रेरणेने, निरलसवृत्तीने, संस्कार सेवा समर्पण या भावनेने सुरू असलेले कार्य पाहून राष्ट्राचे भवितव्य उज्वल आहे असे मत व्यक्त केले.
भारत विकास परिषद व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने पुढाकार घेऊन व्याख्यानमालेच्या माध्यमातून चांगल्या विषयांद्वारे जेन – झी अर्थात युवा पिढीवर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
भारत विकास परिषदेच्या संपर्क फाउंडेशनच्या कार्याचा त्यांना स्वतःला आलेला चांगला अनुभव देखील त्यांनी सांगितला. शेवटी उद्दिष्टांची स्पष्टता व एक वाक्यता, पारदर्शकता, सामूहिकता, शाश्वतता या चतुसूत्रीने कार्य करावे असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी सुरेश मंत्री, प्रांत अध्यक्ष विशाल चोरडिया, मावळत्या अध्यक्षा हेमांगिनी महाजन, नूतन अध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने यांनी मनोगत व्यक्त केले.
सोहळ्यात नूतन पदाधिकारी व नूतन कार्यकारणीला विशाल चोरडिया व प्रांत पालक अरुण जोशी यांनी शपथ दिली.
नूतन कार्यकारणीत सहसचिव डॉ. विकास चौधरी, माजी अध्यक्ष हेमांगिनी महाजन, माजी सचिव डॉ. अनुपम दंडगव्हाळ, संघटन सचिव उमेश पाटील, उपाध्यक्ष रामेश्वर भावसार यांच्यासह डॉ. योगेश पाटील, जान्हवी खाडिलकर, गायत्री कुलकर्णी, उल्हास सुतार, अनिता भावसार, चिन्मय खटावकर, अश्विनी शिंदे, नीलिमा पाटील, उज्वला चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र जोशी, दीपक शेठ यांचा कार्यकारणी सदस्य म्हणून समावेश आहे.
सचिव डॉ. अनुपम दंडगव्हाळ यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा सचित्र अहवाल सादर केला.भारत विकास परिषदेच्या वेब पेजचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. माजी प्रांताध्यक्ष रवींद्र लढढा यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी दीप प्रज्वलन व प्राजक्ता दंडगव्हाळ यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. परिचय अनिता भावसार व अनिता नारखेडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी तर आभार नूतन सचिव भूषण गुरव यांनी मानले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.









