---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ उपविभागात पोलीस प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक मोहिमा राबवत धडाकेबाज कारवाई केली आहे. 28 एप्रिल रोजी भुसावळ शहर, तालुका, नशिराबाद आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही संयुक्त मोहीम पार पडली.
वाहतूक कारवाईत 177 केसेस; मोठा दंड वसूल:
मोटार वाहन कायद्यानुसार एकूण 177 केसेस नोंदवण्यात आल्या असून, 1 लाख 31 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या 10 केसेस, तर बेकायदेशीर बुलेट सायलेंसरच्या 3 केसेस आढळून आल्या.
अवैध धंद्यांवर 9 केसेस दाखल करत 1 लाख 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त;
दारूबंदी अंतर्गत 9 केसेस दाखल करत 1 लाख 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार प्रकरणात 4 केसेस, तसेच अमली पदार्थ सेवनाशी संबंधित कारवाई (NDPS) आणि कोपटा अंतर्गत 29 केसेस नोंदवण्यात आल्या.
वॉरंट आणि कायदेशीर कारवाई:
नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) अंतर्गत 12 आरोपींना अटक करण्यात आली, तर बेलेबल वॉरंटच्या 19 आणि समन्सच्या 16 बजावण्या करण्यात आल्या. याशिवाय BNSS 126/129 अंतर्गत 9 आणि BNSS 285 अंतर्गत 17 केसेस नोंदवण्यात आल्या.
महिला व बाल सुरक्षेच्या दृष्टीने 17 ठिकाणी तपासणी:
महिला व बाल सुरक्षेच्या दृष्टीने हॉटेल, लॉज आणि ओयोवर 17 ठिकाणी तपासणी करण्यात आली. तसेच ट्रॅव्हल्स व वाहन तपासणीदरम्यान 6 केसेस, तर धाब्यांवर 4 कारवाया करण्यात आल्या.
‘मुस्कान’ मोहिमेतही मिळालं यश:
नशिराबाद येथे हरवलेल्या एका मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान पोलीस प्रशासनाच्या या मोहिमेमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.









