रसलपूर येथे गोमांस विकणाऱ्यावर पोलीसांची कारवाई; १५० किलो गोमांस जप्त..!

---Advertisement---

 

रावेर तालुक्यातील रसलपूर येथे अवैध गोवंश कत्तल करून गोवंश मास विक्री करणाऱ्या एका जणावर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धाड टाकून केलेल्या कारवाईत एकूण सुमारे ३० हजार रुपये किमतीचे अंदाजे १५० किलो वजनाचे गोमांस जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री सुरू आहे. या माहितीवरून पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला रसलपुर येथील कुरेशी मोहल्यामध्ये एकाकडे गोवंश जातीचे जनावरांची अवैद्यरीत्या कत्तल करुन गोमांस विक्री करीत आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार पथकाने रसलपुर येथील कुरेशी मोहल्ल्यात आज सकाळी सहा वाजता एका घरावर छापा टाकला. यावेळी शेख अनिस शेख आयुब अवैद्यरीत्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन गोमांसाची अवैद्यरीत्या विक्री करण्यासाठी गोमांस कब्जात बाळगतांना मिळुन आला. ३० हजार रुपये किंमतीचे गोवंश जातीच्या जनावराचे एकुण १५० किलो गोमांस मिळून आले. याबाबत पो.कॉ श्रीकांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सुनिल मोरे पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---