सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात १६ लाखांची चोरी

---Advertisement---

 

कारंजा लाड : येथील मेमन कॉलनी भाग ३ मध्ये सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात अज्ञात चोरांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर १६ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जमील रहीम शेख मुंबई पोलिस दलातून पोलिस निरीक्षक पदावरून गतवर्षी सेवानिवृत्त झाले.

अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकर फोडून मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. चोरीस गेलेल्या ऐवजात १० तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, विविध दागिने, अंगठ्या, नेकलेस सेट, चेन, मनगटी घड्याळे तसेच ६० हजार रुपयांची रोख रक्कम असा १६.३० लाख रुपयांचा माल समाविष्ट आहे. सर्व दागिने एका पर्समध्ये ठेवले होते.

या प्रकरणात कारंजा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक जयदीप पवार, गणेश जाधव, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बीबेकर, मोहम्मद परसुवाले, अनिस निनसुरवाले, अमित भगत, नितीन पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---