ॲमेझॉन इंडिया करणार २८०० कोटींची गुंतवणूक, कर्मचारी सुविधा, डिलिव्हरी नेटवर्क करणार बळकट

---Advertisement---

 

नवी दिल्ली : ॲमेझॉन इंडियाने भारतातील आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता व कल्याणासाठी तब्बल २८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक डिलिव्हरी सेवा अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासोबतच हजारो कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, विमा आणि सामाजिक सुरक्षेसाठी वापरली जाणार आहे, असे कंपनीने सांगितले.

ही गुंतवणूक भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याच्या मोठ्या योजनेचा भाग आहे. या योजनेत व्यवसाय विस्तारासोबतच एआय आधारित डिजिटलायझेशन, निर्यात वाढ आणि रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला जाणार आहे. ॲमेझॉनने भारतात आपले फुलफिलमेंट सेंटर्स, सॉर्टेशन सेंटर्स आणि डिलिव्हरी नेटवर्क आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील मोठ्या शहरांसोबतच छोट्या शहरांमध्येही जलद डिलिव्हरी शक्य होणार आहे. कंपनी आपली क्विक कॉमर्स सेवा ‘ॲमेझॉन नाऊ’ देखील अधिक शहरांमध्ये विस्तारण्याच्या तयारीत आहे.

आमच्या नेटवर्कच्या केंद्रस्थानी कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्यासाठी आम्ही मोठी गुंतवणूक करत आहोत, असे ॲमेझॉन इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अभिनवसिंग यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित विश्रांती केंद्र

कंपनीने कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी अनेक नवीन उपक्रम जाहीर केले आहेत. ‘प्रोजेक्ट आश्रय’ अंतर्गत डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित विश्रांती केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. या केंद्रांमध्ये बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे, मोबाइल चार्जिंग पॉईंट आणि प्राथमिक उपचार सुविधा असतील. सध्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---