भुसावळ शहरात बालविवाह सुरू असतानाच पोलिसांची धाड; पाच जणांवर बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

भुसावळ शहरातल्या तेली समाज मंगल कार्यालयात बालविवाह लावून दिल्याचे गंभीरखट्टा उघडकीस आली आहे. याप्रकरणी वर वधूच्या पालकांसह एकूण पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने चाइल्ड हेल्पलाइन (१०९८) क्रमांकावर 30 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास संपर्क केला. भुसावळ शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात बालविवाह सुरू असल्याची माहिती अज्ञात आणि पोलिसांना संपर्क करून दिली. या माहितीची तात्काळ पोलिसांनी दखल घेत बालविकास प्रकल्प अधिकारी यांना संपर्क साधत घटनास्थळी रवाना झाले. पथक दुपारी 1 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. पथक पोहोचेपर्यंत विवाहाचे सर्व विधी हे पूर्ण झालेच आढळून आलं. यावेळी पथकाने मुलाच्या वडिलांकडे जन्मदाखलांचा पुरावा मागितला. मात्र त्यांनी दाखला देण्यास टाळाटाळ करत विलंब केला.

दरम्यान दिनांक 1 मे रोजी बालकल्याण समिती जळगाव येथे मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत सादर केली. यात मुलगी ही विवाहाच्या दिवशी 17 वर्ष 8 महिन्यांची असल्याचा निष्पन्न झालं. यावरून मुलीच्या व मुलाच्या परिवारासह इतर पाच जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---