भुसावळ तालुक्यातील सुनसगावात घरफोडी; वडिलोपार्जित वस्तूंसह 41 हजारांचा ऐवज लंपास…

---Advertisement---

 

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे धाडसी घरफोडीची घटना घडली आली असून चोरट्यांनी सुमारे 41 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप मुरलीधर पाटील (वय 69, व्यवसाय शेती, सध्या रा. नाशिक रोड, नाशिक; मूळ रा. सुनसगाव) यांनी चोरीबाबत तक्रार दाखल केली आहे. सुनसगाव येथील घर क्रमांक 169 च्या वरच्या मजल्यावर 1 ऑक्टोबर 2025 ते 4 मे 2026 या कालावधीत ही चोरी झाली असल्याचं त्यांनी म्हटल आहे. चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील तांबे, पितळ व कासेची भांडी तसेच दोन लोखंडी खाटा असा एकूण सुमारे 41 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विशेषतः वडिलोपार्जित वस्तू चोरीला गेल्याने फिर्यादीला मोठा आर्थिक व भावनिक धक्का बसला आहे.

या प्रकरणात गावातीलच एका संशयित व्यक्तीवर फिर्यादीने संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल धीरज मंडलीक तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---