महाराष्ट्र मध्ये मद्यप्रेमींच्या पसंतीत मोठा बदल; विदेशी दारूला बाजूला सारून, राज्यात बिअरचा विक्रमी मागणी…!

---Advertisement---

 

महाराष्ट्र मध्ये मद्यप्रेमींच्या पसंतीत मोठा बदल झाल्याचं चित्र समोर आलं आहे. देशी आणि विदेशी मद्यावर वाढलेल्या उत्पादन शुल्कामुळे आता अनेकांनी आपला मोर्चा बिअरकडे वळवला असून राज्यात बिअरचा विक्रमी खप नोंदवला गेला आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने देशी आणि विदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली होती. त्यामुळे मद्याच्या किंमती वाढल्या आणि ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू लागले. या दरवाढीचा थेट परिणाम आता विक्रीच्या आकडेवारीत दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यात तब्बल ४६ कोटी १३ लाख लिटर बिअरची विक्री झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः उन्हाळ्यात बिअरची मागणी वाढते, मात्र यंदा ही मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

दुसरीकडे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा खप कमी झाल्याचं दिसून आलं आहे. २०२५ मध्ये ३२ कोटी लिटर असलेला विदेशी मद्याचा खप यंदा २७ कोटी लिटरवर घसरला आहे. तर देशी दारूची विक्रीही वाढून ४२ कोटी लिटरपर्यंत पोहोचली आहे.

मद्यावरील शुल्कवाढीमुळे राज्य सरकारच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. उत्पादन शुल्कातून मिळणारे उत्पन्न यंदा जवळपास ३० हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या महसुलात सुमारे १८ टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यातील बदलत्या मद्यपानाच्या ट्रेंडमुळे आता बिअर उद्योगालाही मोठा फायदा होताना दिसत आहे. वाढत्या उष्णतेसोबतच वाढलेल्या मद्यदरांचा परिणाम ग्राहकांच्या पसंतीवर स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---