पाच वर्षात भूजल पातळीत सरासरी 3.46 मिटरने घट दमदार पाऊस होवूनही जलसंधारण योजनेकडे प्रशासनासह सर्वसामान्यांकडून दुर्लक्षच

---Advertisement---

 

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात सद्यस्थितीत सर्वदूर पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे. राज्य सरकारकडून दुष्काळ, अवर्षण, पाणीटंचाई लक्षात घेता 2015 ते 2017 दरम्यान जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यासारख्या अनेक योजना राबविल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात का होईना. शासनाच्या जलसंधारण योजनेला गती मिळून 2019-20 पर्यंत 150.16 मिटरने भूजल पातळीत बरीच वाढ झाली होती. परंतु गेल्या पाच वर्षात दमदार पाऊस होवूनही जलसंधारण कामांकडे शासन आणि प्रशासनासह सर्वांनींच दूर्लक्ष केल्यामुळे भूजल पातळीत तब्बल 3.46 मिटरने कमालीची घट झाली असल्याचे शासनाच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या निकर्षानुसार दिसून येत आहे.

राज्यात दुष्काळ अवर्षण पूरस्थिती, बेमोसमी पाऊस, गारपीट आदी नैसर्गीक ंसंकटे अल निनो, अल निना यासह पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या प्रदूषण वाढविणाऱ्या घटकांमुळे निर्माण होत आहेत. पूर्वीची घनदाट वनराई, ग्रामीण भागात बांधबंदिस्तीसह वृक्षसंवर्धनामुळे वातावरणातील उष्णता फारशी जाणवत नव्हती. कालांतराने वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात उभी राहणारी सिमेंट कॉक्रिंटच्या इमारती, रस्ते विस्तारीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरणासाठी अमाप वृक्षतोड आदी कारणांमधून पर्यावरणात बदल होवून दिवसेंदिवस तापमानात बदल होत आहेत.


2010-12 नंतर वारंवार सततचे अवर्षण, दुष्काळ, कमी पर्जन्यमान यामुळे पाणीसाठयांवर परिणाम होवून टंचाईसह अन्य नैसर्गीक संकटांला सामोरे जावे लागले आहे. यात 20218-19 दरम्यान पाणीटंचाई निवारणासाठी जळगाव जिल्ह्यात तब्बल 257 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला असून करोडो रूपये खर्च झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, शासनस्तरावरून 2015 नंतर जलसंवर्धन योजनांतर्गत जलयुक्त शिवार योजना 1 आणि 2 ची अंमलबजावणी करण्यात आली.


तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्षमतेने अंमलबजावणी
यात ठिकठिकाणी जलयुक्त शिवार अंतर्गत नदी नाले खोलीकरण, गाळ काढणे, डोंगर उतारावर चर काढून पाणी अडवा पाणी जिरवा, शतकोटी वृक्ष लागवड, संवर्धन, झाडे जगवा, आदी योजनांची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, रूबल अग्रवाल, डॉ.अविनाश ढाकणे आदी अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात सक्षमतेने राबविण्यात आली. करण्यात आली.


भूजलपातळीत वाढ
यामुळे जळगाव जिल्ह्यात जून 2019 मान्सूनसह वर्षभरात भूजल पातळीस्तर उंचावण्यास मदत होवून तब्बल दिड ते तीन मिटरने वाढ झाली होती.
योजनांच्या सातत्याकडे दूर्लक्ष
परंतु, 2019-20 नंतरच्या मान्सूनकाळात समाधानकारक सरासरीपेक्षा दिड पट पावसामुळे जलसंधारण योजना संवर्धन वा सातत्य राखण्यात दुर्लक्ष झाले आहे. यामुळे सद्यस्थितीत गत पाचवर्षापूर्वीपेक्षा दुपटीने म्हणजेच सरासरी 3.46 मिटरने भूजल पातळीत मोठया प्रमाणात घट झाली असल्याचे प्रशासनाच्या अहवालातून दिसून येत आहे.


भूजल पातळीचे चार वेळा सर्वेक्षण
जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण यंत्रणांव्दारे भूजल पातळीचे निरीक्षण, वाचन जानेवारी, मार्च, मे, आणि मान्सूननंतर सप्टेंबर असे चार वेळा नोंदी घेतल्या जातात. गेल्या पाच वर्षापूर्वी सप्टेंबर 2020 दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी 2015 ते 2020 पाच वर्षात भूजलपातळीच्या सरासरीशी तुलनात्मतक अभ्यास केला असता, जिल्ह्यातील 15 तालुक्यात निरीक्षण विहीरींच्या भूजल पातळीत सरासरी दिड ते दोन मिटरने वाढ झाली असल्याची नोंदवण्यात आले होते.


प्रत्येक तालुक्यात विहिर निर्धारीत
जिल्ह्यात जामनेर 24, चाळीसगाव 21, पारोळा 16, जळगाव 15, पाचोरा 14, अमळनेर 13, मुक्ताईनगर 11, रावेर 10, भडगाव 8, यावल आणि धरणगाव आणि भुसावळ प्रत्येकी 7, बोदवड 6 अशा एकूण 175 निर्धारित करण्यात आलेल्या विहीरींचे सर्वेक्षण वाचन नोंदी

वर्षभरातून चार वेळा घेण्यात येतात.
यंदा तब्बल साडेतीन मिटरने घट
यंदा सप्टेंबर 2025, जानेवारी मार्च दरम्यान सर्वेक्षण वाचन नोंदी घेण्यात आल्या. यात पाच वर्षापूर्वी 150.16 मिटर असलेली भूजल पातळी बोदवड, अमळनेर, धरणगाव, आणि पारोळा हे चार तालुके वगळता तब्बल 146.71 मिटर पर्यंत घसरलेली आढळून आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

तालुका 5 वर्षापूर्वी स्थिती आजची स्थिती फरक
यावल 23.84 22.05 1.79
रावेर 17.08 16.63 0.35
जळगाव 14.00 14.016 0.24
चोपडा 12.97 12.04 0.93
मुक्ताईनगर 11.06 10.72 0.34
बोदवड 10.50 10.77 -0.27
भुसावळ 9.33 8.95 0.38
अमळनेर 7.81 8.15 -0.34
धरणगाव 7.33 7.53 -0.20
जामनेर 7.21 7.00 0.20
चाळीसगाव 6.75 6.60 0.15
पारोळा 5.78 5.93 -0.15
पाचोरा 5.73 5.71 0.02
भडगाव 5.44 5.34 0.09
एरंडोल 4.93 5.13 0.93
एकूण 150.16 146.71 3.46

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---