शालेय वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी अनिवार्य 31 मे पूर्वी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन

---Advertisement---

 

शालेय वाहनांच्या कागदपत्रांची ३१ मे पर्यंत पूर्तता करण्याचे आवाहन
जळगाव: जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शालेय वाहनांची (बस आणि व्हॅन) कागदपत्रे वैध असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित आणि विनाअपघात व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कडक निर्देश दिले आहेत.


कागदपत्रांची तपासणी: वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र (योग्यता प्रमाणपत्र), परवाना, पीयूसी, विमा आणि इतर संबंधित कागदपत्रे वैध असणे अनिवार्य आहे.

शाळा व्यवस्थापनाने स्वतः स्तरावर कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी करावी. कागदपत्रे अपूर्ण असल्यास संबंधित वाहनचालक किंवा मालकास ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

सर्व वाहनधारक आणि चालकांनी ३१ मे २०२६ पूर्वी फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहन कर आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आरटीओ कार्यालयामार्फत ‘अतिरिक्त अपॉइंटमेंट’ (विशेष कोटा) उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी गजेंद्र वर्मा यांनी दिली आहे.

तपासणीदरम्यान कागदपत्रे अपूर्ण आढळल्यास संबंधित वाहन जप्त केले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळा व्यवस्थापन आणि वाहनधारकाची राहील, असे आरटीओने स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---