पुतिन पुन्हा भारताच्या मदतीला! रशियाची मोठी घोषणा; ‘त्या’ एका शब्दाने भारताची ऊर्जा चिंता मिटली

---Advertisement---

 

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील तणाव, स्ट्रेट ऑफ होर्मुजवरील संकट आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या दरांमुळे जगभरात ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली असताना भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाने भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत मोठी हमी दिली असून, कोणत्याही परिस्थितीत भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा थांबणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दिल्लीमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेय लावरोव यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत मोठी घोषणा केली. भारत आणि रशियामधील राजनैतिक तसेच आर्थिक संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


रशिया भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगताना लावरोव म्हणाले की, “भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच राहील. कोणत्याही परिस्थितीत भारताला तेलाची कमतरता भासू दिली जाणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे वाढत्या तेलसंकटाच्या पार्श्वभूमीवर भारताची मोठी चिंता दूर झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भारत-रशिया मैत्रीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी अमेरिकेच्या निर्बंधांना यासाठी जबाबदार धरले. “भारत-रशिया संबंधांबाबत चिंता करण्याचे कारण नाही. रशियाकडून भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---