---Advertisement---
दोंडाईचा शहर भोई समाजाच्या वतीने संत शिरोमणी भीमा भोई यांच्या 175 व्या जयंतीनिमित्त नवाभोई वाडा येथे प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला समाजबांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास दोंडाईचा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय पाटील, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती मुकेश देवरे, आरोग्य सभापती छोटू सोनवणे, नगरसेवक विजय मराठे, कृष्णा नगराळे, भैया धनगर, चतुर पाटील, संजोग रामोळे, रामभाऊ माणिक, राकेश अग्रवाल, मनोज तेले, माजी नगरसेवक संजय तावडे, कैलास वाडिले, शैलेश नागरे, अनिकेत आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित नगरसेवक व पाहुण्यांचा समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी विकासरत्न सरकारसाहेब रावल, माँसाहेब नयनकुंवर रावल तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या. विजय मराठे आणि कृष्णा नगराळे यांनीही मनोगत व्यक्त करत समाजबांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश वाडिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भोई यांनी केले. प्रास्ताविक संजोग रामोळे यांनी तर आभार प्रदर्शन कैलास वाडिले यांनी केले.
यावेळी समाजातील ज्येष्ठ म्हणून मधुकर तावडे, तुकाराम वाडिले, प्रभाकर तावडे, दिलीप रामोळे, सीताराम वाडिले, कैलास तमखाने, वसंत साटोटे, सुकदेव रामोळे, राजाराम भोई, सुधाकर वाडिले आणि आनंदा भोई यांची प्रमुख उपस्थिती होती.









