---Advertisement---
यावल शहरातील बस स्थानकात प्रवासासाठी आलेल्या एका दांपत्या जवळील रोख रक्कम व सोन्याचे दागिने अद्यात चोरट्याने चोरी केले आहे. सदर चोरीची घटना रविवारी घडली होती. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६५ हजाराचा मुद्देमाल बस स्थानकावर प्रवासासाठी आलेल्या या दांपत्याजवळून लांबवण्यात आला आहे.
यावल शहरातील या बसस्थानकात असलेल्या कंट्रोल कॅबिनच्या जवळ प्रवासासाठी हाफिज खान अब्बास खान वय ४९, त्यांची पत्नी फरजाना बी व मुलगी सदफ परविन रा. तहा नगर, फैजपूर हे प्रवासासाठी आले होते. दरम्यान कंट्रोल कॅबीनच्या शेजारी ते बसलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याच्या पत्नीच्या पर्समध्ये असलेला सोन्याचा हार, पाच हजाराची रोकड असा एकूण ६५ हजाराचा मुद्देमाल चोरी केला. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.-









