8th Pay Commission Update: 8 वा वेतन आयोग ‘या’ वर्षी लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि थकबाकीबाबत मोठी अपडेट?

---Advertisement---

 

8th Pay Commission Update: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयोगाकडून कर्मचारी संघटना, विविध विभाग आणि पेन्शनधारकांशी चर्चा सुरू असून मंजुरीनंतर 2027 अखेरपर्यंत नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या आयोगाकडून वेतनवाढ, पेन्शन, भत्ते, सेवा अटी आणि निवृत्तीवेतनासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जात आहे. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे विविध फिटमेंट फॅक्टर सुचवले असून त्यावर आयोग स्तरावर विचार सुरू आहे.

आयोगाचा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर तो मंत्रिगटाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मंजुरी मिळाल्यावर सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाईल. विशेष म्हणजे, आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनची थकबाकी म्हणजेच एरिअर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, पहिल्या ते पाचव्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तब्बल 20 महिन्यांपर्यंतची थकबाकी मिळू शकते. मात्र, नेमकी रक्कम किती असेल याबाबत अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

मात्र 8 व्या वेतन आयोगाने उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे बैठक घेत विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा केली. तसेच जम्मू-कश्मीर आणि लद्दाखमध्येही बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठकींमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.

8 व्या वेतन आयोगाच्या हालचालींमुळे देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष आता केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---