दहिगावच्या एमएसएफ जवानाचा चंद्रपुरच्या तलावात बुडून दुदैवी मृत्यु; आठवडयात दुसऱ्या तरूणाचा मृत्यु झाल्याने गावात शोककळा…!

---Advertisement---

 

यावल तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील रहिवाशी चंद्रपुर या ठीकाणी एमएसएफ जवान म्हणुन सेवेत असलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक २६ रोजी दुपारी घडली असून, घटनेमुळे दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

दहिगाव येथील विजय ओंकार काळे (वय ३४) हा चंद्रपूर येथे महाराष्ट्र सेक्युरिटी फौर्समध्ये कार्यरत होता, काल दिनांक २६ रोजी दुपारी तीन वाजेचे सुमारास तो आणि त्याचे मित्र तीन मिळून चंद्रपूर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते, दोघे मित्र पाण्यात उतरले असता त्यांना वाचवण्याकरिता विजय काळे यांनी सुद्धा पोहण्यासाठी उडी टाकली, पण त्यांना पाण्याचा अंदाज न समजल्याने तलावात बुडाले, आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. आज दिनांक २७ रोजी पहाटे त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला याबाबत चंद्रपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

विजय काळे याचे पश्चात आई वडील पत्नी तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे .या आठवड्यात दहिगाव मध्ये दोन वेगवेगळया घटना दोन तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्या च्या घटनांमुळे गावावर शोककळा पसरली असून मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबांवर कोसळला आहे. विजय हा गेल्या चार वर्षापासून एम एस एफ मध्ये कार्यरत होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---