पुणे हादरले! विषारी दारूमुळे २४ तासांत १३ जणांचा संशयास्पद मृत्यू; पिंपरी अन् हडपसर परिसरात खळबळ

---Advertisement---

 

पुणे: पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूची मालिका सुरू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १३ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरात ८ जणांचा, तर हडपसर परिसरात आणखी ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या विषारी दारू प्रकरणामुळे अनेक हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, “या घटनेला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही नागरिकांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

हडपसर आणि काळेपडळ परिसरात ५ बळी
हडपसर आणि काळेपडळ परिसरात पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाल्यानंतर काही जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:

राहुल शरद क्षीरसागर (वय ४५, पांढरे मळा, हडपसर)

विजय भूकुरलाल शर्मा (वय ४५, ससाणे नगर, हडपसर)

अरुण डाडर (हडपसर)

अशोक रमेश चव्हाण (काळेपडळ)


फुगेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरातही विषारी दारू पिल्याने ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांची नावे पुढीलप्रमाणे:

पांडुरंग फुगे

विजय प्रकाश राठोड

राजेंद्र प्रकाश राठोड

राजू राजपूत

अकबर पठाण

बाबा शेख

आनंद देसाई

आनंद निकाळजे

दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक
या घटनेत विषबाधा झालेल्या इतर दोन नागरिकांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
१. सुभाष डिगीकर – (मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू)
२. अक्षय अवसरमल – (यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू)

पोलिसांकडून तपास सुरू; एक संशयित ताब्यात
या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली, तरी सर्व मृतांच्या मृत्यूचे कारण एकसारखे (पोटदुखी व उलट्या) असल्याने पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. पोस्टमार्टम (शवविच्छेदन) अहवाल आल्यानंतर आणि अधिकृत फिर्याद प्राप्त झाल्यानंतर पुढील गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---