---Advertisement---
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर सर्व 16 उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
छाननीदरम्यान काही अर्जांमध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत संबंधित उमेदवारांना लेखी सूचना देण्यात आल्या. मात्र आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि प्रक्रियेनंतर सर्व अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत.
यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी तसेच शिवसेना शिंदे गटातील बंडखोर उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर जळगाव विधान परिषद मतदारसंघाचा नवा प्रतिनिधी कोण ठरणार, हे स्पष्ट होणार आहे.









