‘नसीब में होगा तो चलकर आयेगा…’ चिरंजीव प्रताप पाटील यांना तिकीट न मिळाल्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया…

---Advertisement---

 

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी चिरंजीव प्रताप पाटील यांना उमेदवारी न झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रथमच सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी प्रारब्धावर विश्वास ठेवण्याचा सल्ला देत सकारात्मक भूमिका मांडली आहे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आयोजित एका कीर्तन सोहळ्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “काही लोक म्हणतात तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज आहेत. पण नसीब में होगा तो चलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा. त्यामुळे फिकीर करायची नाही.”

यावेळी त्यांनी पुढे बोलताना, “याच्यातूनही काही चांगले होणार असेल, देवाच्या मनात काही वेगळे असेल. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवला पाहिजे,” असेही सांगितले.

जळगाव विधान परिषद मतदारसंघासाठी उमेदवारीच्या चर्चांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांचे पुत्र प्रताप पाटील यांना संधी मिळावी यासाठी आग्रही असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र उमेदवारी जाहीर न झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते.

अशा परिस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रतिक्रियेतून नाराजीपेक्षा नियती आणि प्रारब्धावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिल्याचे मानले जात आहे.

आगामी स्थानिक राजकारण आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याचे विविध अर्थ काढले जात असून राजकीय चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---