‘अध्यात्म उपासना शिरोमणी’ पुरस्काराने प्रा. अभिजीत अवताडे-उपाध्ये यांचा गौरव….

---Advertisement---

 

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील मांजरादेवी संस्थान परिसरात आयोजित ज्योतिष, वास्तू आणि अध्यात्म अधिवेशन उत्साहात पार पडले. राज्यभरातील ज्योतिषतज्ज्ञ, वास्तू अभ्यासक, अध्यात्म क्षेत्रातील मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

श्री अत्रेय ज्योतिष वास्तू-अध्यात्म संस्था आणि सद्गुरु अण्णा महाराज दत्तप्रबोधिनी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अधिवेशनात ज्योतिषशास्त्रातील आधुनिक बदल, वैज्ञानिक दृष्टीकोन, सकारात्मक मार्गदर्शनाची आवश्यकता आणि बदलत्या काळानुसार स्वीकारावयाच्या नव्या पद्धती यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात पंचांगकर्ते मोहनराव दाते यांना ‘धर्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर राधेश बादले पाटील यांना ‘ज्योतिष कार्य गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दै. तरुण भारतचे पंढरपूर प्रतिनिधी प्राध्यापक अभिजित अवताडे यांना ‘अध्यात्म उपासना शिरोमणी’ हा मानाचा किताब प्रदान करून गौरविण्यात आले. याशिवाय विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

अधिवेशनातील विशेष आकर्षण ठरले ते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांची प्रकट मुलाखत. यावेळी धर्म, अध्यात्म आणि ज्योतिष विषयक अनेक प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. त्यांच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात पंढरपूरचे ज्योतिर्विद, लेखक, प्राध्यापक आणि पत्रकार प्रा. अभिजीत अवताडे-उपाध्ये यांना ‘अध्यात्म उपासना शिरोमणी’ हा मानाचा किताब प्रदान करून गौरविण्यात आले. ज्योतिष, अध्यात्म, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

प्रा. अभिजीत अवताडे-उपाध्ये हे पंढरपूर परिसरात ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असून धार्मिक, सांस्कृतिक आणि चरित्रात्मक लेखनासाठीही परिचित आहेत. तसेच ते ‘दै.तरुण भारत’चे पंढरपूर प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत.

या अधिवेशनाचे नियोजन आणि आयोजन गुरुश्री प्रियाताई मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---