बायकोने दारु पिण्यास नाही म्हंटल म्हणून नवऱ्याने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने परिसर हळहळला…

---Advertisement---

 

पिंपरी-चिंचवड शहरातून दारूच्या व्यसनातुन एकाने आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना चिंचवड परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव अरविंद लक्ष्मण लोहार असे आहे. त्यांना दारूचे व्यसन होते आणि याच कारणावरून घरामध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते. घटनेच्या दिवशीही त्यांनी दारू पिण्याचा आग्रह धरला होता. मात्र पत्नीने त्यास विरोध केल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला.

या वादानंतर संतप्त झालेल्या अरविंद लोहार यांनी घरात ठेवलेले ढेकूण मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने थेरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत आवश्यक पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत असले तरी या घटनेमागील नेमकी कारणे आणि इतर बाबींचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---