भारतात Keeway आणते सर्वात स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर! Ola-Ather ची वाढली चिंता? फिचर्स पाहून बसाल थक्क…

---Advertisement---

 

भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात स्पर्धा अधिक तीव्र होत असताना प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Keeway आपला पहिला इलेक्ट्रिक स्कूटर EZI Hypevolt लाँच करण्याच्या तयारीत आहे. प्रीमियम फीचर्स, आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्समुळे हा स्कूटर लॉन्चपूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे.

Keeway च्या EZI ब्रँड अंतर्गत सादर होणाऱ्या या स्कूटरमध्ये ADAS, रियर कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, इंटेलिजंट क्रूझ कंट्रोल आणि नेव्हिगेशन सपोर्टसह TFT डिस्प्ले यांसारखी अत्याधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा स्कूटर प्रीमियम EV सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करू शकतो.

कंपनी हा स्कूटर V1 आणि V2 अशा दोन व्हेरिएंटमध्ये सादर करू शकते. V1 मॉडेलमध्ये 65 किमीपर्यंत रेंज आणि 80 किमी प्रतितास टॉप स्पीड मिळू शकतो. तर V2 व्हेरिएंटमध्ये 125 किमीपर्यंत रेंज आणि तब्बल 115 किमी प्रतितास टॉप स्पीड मिळण्याची अपेक्षा आहे.ड्युअल LED हेडलॅम्प्स, स्पोर्टी बॉडी पॅनेल्स, स्प्लिट सीट्स आणि 14 इंच अलॉय व्हील्समुळे EZI Hypevolt ला आकर्षक आणि आधुनिक लूक मिळणार आहे.

याशिवाय कीलेस स्टार्ट, डिस्क ब्रेक, USB चार्जिंग पोर्ट आणि मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्सही दिले जाऊ शकतात.माध्यमांतील वृत्तांनुसार, Keeway EZI Hypevolt पुढील महिन्यात भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. लॉन्चनंतर Ola, Ather, TVS आणि Bajaj सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना तो थेट आव्हान देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---