शिवराज्याभिषेक दिनी जामनेरमध्ये वाचनालय उद्घाटन, रुग्णवाहिका लोकार्पण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…

---Advertisement---

 

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर यांच्या वतीने वाचनालय उद्घाटन, रुग्णवाहिका लोकार्पण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्व मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी श्यामचैतन्य बापू महाराज, प्रख्यात वक्ते नीलेश चव्हाण, प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या सुषमा दीदी, हभप एकनाथ महाराज चवरे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, आदर्श शिक्षक गजानन मांडवे तसेच डॉ. विनोद भोई यांचा सत्कार करण्यात आला.तोंडापूर अभ्यासिकेच्या वतीने साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानच्या वाचनालयासाठी ११ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. धार्मिकतेकडून अभ्यासिकेकडे वाटचाल घडवून आणणारा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाने जामनेर शहरातून सुमारे दीड हजार पुस्तके संकलित करून वाचनालयासाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना मोठा लाभ होणार आहे.

यानंतर वाचनालयाचे उद्घाटन, रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर सातवे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक माळी यांनी तर आभार प्रदर्शन जितू कुमावत यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---