अधिकमासानंतर जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीचे दर पुन्हा भडकले; वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये चिंता…!

---Advertisement---

 

अधिक मासानंतर जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. जळगावातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात ६ हजार रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांचे लक्ष पुन्हा सराफ बाजाराकडे वेधले गेले आहे.

अधिकमासाच्या महिनाभराच्या काळात जळगाव जिल्ह्यातील सराफा बाजारात महिनाभरात १०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली. मात्र, ही उलाढाल मोठी असली तरी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सोने-चांदी खरेदीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

सध्या सुवर्णनगरीत सोन्याचा दर प्रति १० तोळे सुमारे १ लाख ५१ हजार रुपये, तर चांदीचा दर २ लाख ५४ हजार रुपये (जीएसटीविना) इतका पोहोचला आहे. मात्र दरातील सातत्याने होणाऱ्या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून नवीन खरेदीबाबत अनेकजण सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल नवीन सोने खरेदी करण्याऐवजी जुने सोने देऊन नवीन दागिने बनवून घेण्याकडे वाढला आहे. त्यामुळे दागिने बदलण्याच्या व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील घडामोडी, वाढती गुंतवणूक आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे आगामी काळातही सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---