पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करायला आलेल्या महिलेच्या पिशवीतून ५० हजारांची चोरी; ब्लेडने पिशवी कापून रोकड लंपास…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे पोस्ट कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रेहानाबी शेख या महिला पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांच्या कापडी पिशवीत ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड अज्ञात दोन महिलांनी ब्लेडच्या सहाय्याने पिशवी कापून चोरून नेली. व्यवहार पूर्ण करण्याच्या गडबडीत हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही.

घटनेनंतर पोस्ट ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता, दोन संशयित महिला परिसरात संशयास्पद हालचाली करताना दिसून आल्या आहेत. या महिलांचा शोध पोलीस घेत आहेत.

याप्रकरणी रेहानाबी शेख यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी महिलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोस्ट ऑफिससारख्या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी रोकड व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---