---Advertisement---
अग्रलेख
2014 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुुकीत भारतीय जनता पार्टीला 282 जागा मिळाल्या अन् 30 वर्षांच्या प्रदीघर्र् कालावधीनंतर देशात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे बहुमतातील सरकार सत्तेत आले. पाच वर्षांच्या कामगिरीबाबत समाधान मानत 2019 साली जनतेने पुन्हा एकदा मोदींनाच पंतप्रधान केले. 303 जागा भाजपाला दिल्या. 2014 ते 2019 या काळातील कामगिरी दमदार होती म्हणूनच मतदारांनी मोदींना दुसर्यांदा मोठी संधी दिली. या संधीचे मोदी आणि त्यांच्या सहकार्यांनी सोने केले, हे स्पष्ट दिसते आहे. यंदा मोदींच्या नेतृत्वातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या नऊ वर्षांत केलेली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम स्वत: मोदी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. ‘मोदी अॅट नाईन’ ही मोहीम राबविली जात आहे. कामगिरी केली म्हणूून जनतेपर्यंत पोचविण्याचा नैतिक अधिकार मोदी आणि भाजपाला आहे.
2024 साली मोदींना पराभूत करण्यासाठीमोदी-भाजपा विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांचे ऐक्य घडवून आणत मोदींना सत्तेबाहेर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 23 जून रोजी विरोधकांची एक बैठक पाटण्यात होणार आहे म्हणतात. पण, या बैठकीतून फार काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. लोकशाही आहे. प्रत्येकाला प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विरोधकांनीही ऐक्यासाठी प्रयत्न करण्यात गैर काही नाही. ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि झपाट्याने निर्णय घेत जनतेच्या हिताची कामे सरू केली. त्याचे दृश्य परिणाम आज पाहायला मिळत आहेत. संसदेच्या मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारच्या कामगिरीची तोंडभरून प्रशंसा केली. आता कोणी म्हणेल की, राष्ट्रपतींना सरकारची प्रशंसा करावीच लागते. पण, मोदी सरकारच्या बाबतीत राष्ट्रपती जे काही बोलल्या ते नाईलाजाने नव्हे, तर वस्तुस्थिती तशी आहे म्हणूून बोलल्या होत्या, हे लक्षात घेतले पाहिजे. देशातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येकाला त्याच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, प्रत्येकाचे बँकेत खाते असले पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पााहिजे, प्रत्येकाच्या घरी स्वच्छतागृह असले पाहिजे, प्रत्येकाला मूलभूूत सोईसुुविधा मिळाल्या पाहिजेत, प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे, आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत, देशातील रस्ते उत्तम झाले पाहिजेत, रेल्वेच्या सुविधा उत्तम मिळाल्या पाहिजेत, या आघाड्यांवर मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत दमदार कामगिरी केली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.
मोदी सरकारने देशातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी ज्या योजना कार्यान्वित केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी जर आणखी प्रभावीरीत्या झाली तर दृश्य परिणाम आश्चर्यचकित करणारे असतील यात शंका नाही. अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आणि जनतेच्या हिताच्या कामांंना प्राधान्य दिले, तर जे निराशाजनक चित्र अनेकदा बघायला मिळते, ते बदलल्याशिवाय राहणार नाही. जनहिताची कामे करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. सुदैवाने आताच्या सरकारचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तशी राजकीय इच्छाशक्ती आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांच्यासारखे जे मंत्री आहेत, त्यांंची दमदार कामगिरी पाहिली तर मोदी सरकार सर्व आघाड्यांवर यशस्वी झाले, असे ठामपणे सांगता येते. कोणत्याही देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्या देशात मूलभूत सोईसुविधांंचे जाळे निर्माण करणे गरजेचे असते. रस्ते, पाणी आणि वीज मूलभूूत सुविधांमधील प्रमुख सुविधा मानल्या जातात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉॅन एफ. केनेडी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. अमेरिका श्रीमंत आहे म्हणूून अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत असे नव्हे, तर अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे, असे ते म्हणाले होते. आपल्या देशात सध्या रस्ते विकास खात्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे आहे आणि गडकरींच्या मंत्रालयात केनेडी यांचे हे वाक्य ठळकपणे लावलेले तर आहेच, गडकरी आपल्या भाषणांमधूनही हे वाक्य उद्धृत करीत असतात.
नितीन गडकरी हे नुसते बोलत नाहीत, तर प्रत्यक्ष कृती करतात. आधीच्या केंद्र सरकारच्या काळात देशात दररोज दोन किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय राजमार्ग तयार होत असत. पण, गडकरींनी त्यांच्या नऊ वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्याचा विक‘म केला आहे. या सरकारचा कार्यकाळ संपण्याची वेळ येईल तोपयर्र्ंत हाच वेग वाढून दररोज 40 किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल, असा विश्वास गडकरी यांनीही व्यक्त केला आहे. गडकरींकडे असलेली कल्पकता, त्यांची दूरदृष्टी, त्यांच्याकडे असलेली राजकीय इच्छाशक्ती, त्यांचा धाडसी स्वभाव, प्रामाणिकपणा, देश आणि जनतेप्रति असलेली निष्ठा आणि कळकळ लक्षात घेता हे उद्दिष्ट गाठणे त्यांच्यासाठी कठीण नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अशी दमदार कामगिरी करणारे अनेक मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे निर्धारित उद्दिष्ट गाठत या देशातील नागरिकांचे जीवनमान सुसह्य करण्याचे आव्हान पेलणे मोदी सरकारसाठी अजिबात कठीण नाही. मोदी सरकार सामाजिक आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करीत आहे, हे जे प्रतिपादन राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणातून केले होते, ते योग्यच म्हटले पाहिजे.
देशातील असंख्य गरीब लोकांची बँकेत खाती नव्हती. अशा सगळ्या लोकांची बँकेत खाती असावी, या खात्यांमध्ये गरिबांनी बचत करावी आणि पुढले आयुष्य सुकर करावे, या हेतूने पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने जनधन योजना सुरू केली. देशभरातील सर्व बँकांनी या योजनेला भरीव सहकार्य केले आणि कोट्यवधी गरीब भारतीयांनी बँकांमध्ये आपली खाती उघडली. जगात या योजनेची चर्चाही झाली आणि प्रशंसाही झाली. मुलगी जन्माला घालण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देता यावे म्हणून मोदी सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना प्रभावीपणे राबविली आहे. गरिबांची पीडा दूर करण्यासाठी सरकारचे सगळे प्रयत्न सुरू असून, देशातील 640 जिल्ह्यांमध्ये बेटी बचाओ योजना राबविली गेली आहे. मुस्लिम भगिनींचे दु:ख लक्षात घेत तीन तलाक प्रथा बंद झाली पाहिजे आणि आमच्या मुस्लिम भगिनींचे जीवन सुसह्य झाले पाहिजे या प्रामाणिक हेतूने मोदी सरकारने संसदेत विधेयक पारित करून घेतले आणि दिलासा दिला.
मोदी सरकारला सांप्रदायिक ठरविणार्या मल्टिकम्युनल मंडळींना ही मोठी चपराकही मानली गेली, हे आपल्याला स्मरतच असेल. केंद्र सरकारची जबाबदारी सांभाळताना या देशातील गरीब, पीडित, वंचित, शोषित नागरिक विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे, ही आनंदाची बाब म्हटली पाहिजे. म्हणूनच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत केलेल्या अभिभाषणात मोदी सरकारची प्रशंसा केली होती, यात शंका नाही. आतापर्यंतची या सरकारची कामगिरी लक्षात घेता हे सरकार निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहे. या सरकारचा वर्षभराचा कार्यकाळ शिल्लक असला तरी प्रत्यक्षात डिसेंबरपर्यंतच खर्या अर्थाने काम करता येणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने कामांना प्रचंड वेग दिला आहे. 2024 साली मे महिन्यात होणार्या लोकसभा निवडणुकीत मतदार पुन्हा मोदी आणि भारतीय जनता पार्टीलाच कौल देतील, अशी दमदार कामगिरीमोदी सरकारने केली असल्याने विरोधकांना धडकी भरली आहे आणि त्यातूनच ऐक्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, हेच खरे!
मोदी सरकारकामगिरी दमदार