---Advertisement---

दिगंबर लोखंडे यांचा गुणवंत अधिकारी पुरस्काराने होणार सन्मान

---Advertisement---

जळगाव : अकोला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांना गुणवंत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

राज्याच्या ग्राम विकास विभागांतर्गत २०२३-२०२४ चे गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार नुकतेच जाहिर करण्यात आले. महाराष्ट्र विकास सेवा स्तरावर नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपूरे व अकोला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

तसेच जिल्हा परिषद गट क मधील एकूण २७ कर्मचारी यांना पुरस्कार घोषित झाला आहे. दरम्यान, प्रमोद पवार आणि दिगंबर लोखंडे यांनी जिल्हा परिषद जळगावअंतर्गत गट विकास अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment