जळगाव : शहर महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील २ हजार ३६८ गाळ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अशात मुदत संपलेल्या या गाळ्यांबाबत महापालिकेने ५ टक्के नुसार रेडीरेकरन दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हणत महानगर गाळेधारक संघटनेतर्फे सोमवारी २६ मे रोजी दोन वाजवेपर्यंत मार्केट बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. तसेच महानगरपालिका जळगाव तथा जळगाव महापालिका गाळे भाडे निर्धारण, गाळे हस्तांतरण व गाळे मूलनीकरण समितीत तज्ञ सदस्य म्हणून गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांना घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
मनपाच्या ५ टक्के रेडीरेकरन दर आकारणीचा निर्णय गाळेधारकांना मान्य नसून अविकसीत मार्केटमधील गाळेधारक या दरानुसार ऐवढी रक्कम भरू शकणार नाही. गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह साकारात्मक चर्चा झाल्याने बंद स्थगित करण्यात आला आहे.

जळगाव महापालिकेच्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 368 गाळेधारकांची मुदत 2012 पासून मुदत संपली होती. शासनाकडून गाळेधारकांच्या हीत जोपासून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतू, महापालिकेने स्थापन केलेल्या समितीमध्ये गाळेधारक संघटनेचे तज्ञ प्रतिनिधी समावेश न करता एकतर्फी निर्णय घेतला जात आहे. हे 18 अविकसीत व्यापारी संकुलातील गाळेधारक 5 टक्के रेडिरेकनर नुसार पैसे भरू शकणार नाही. 2 टक्के तसेच 2017-19 पर्यंतचे भाडे दुप्पट घ्यावे अशी मागणी गाळेधारकांची आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांनी गाळेधाकरांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे. महापालिका प्रशासनाच्या विरोधात महापालिकेसमोर तसेच 18 व्यापारी संकुल हे सकाळी दहा ते दुपारी 2 पर्यंत व्यवसाय बंद करून आंदोलन करण्यात आल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली.
हे मार्केट दुपारपर्यंत होती बंद
छत्रपती शाहू मार्केट, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, जुने बी.जे. मार्केट, रामलाल चोबे मार्केट, धर्मशाळा मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, वालेचा मार्केट, जुने शाहू मार्केट, भास्कर मार्केट, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्याना जवळील दुकाने, रेल्वे स्टेशन जवळील मार्केट, शाहू दवाखाना येथील दुकाने, गेंदालाल मिल मार्केट, लाठी शाळा जवळील मार्केट, भोईटे हे 16 मार्केट सोमवारी 27 मे रोजी दुपारी 2 पर्यंत बंद होती.
हे मार्केट दुपारपर्यंत होती बंद
आयुक्तांची भेट घेतांना गाळेधारक संघटनेच्या डॉ.शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, युवराज वाघ, आशिष सपकाळे, प्रदीप मंडोरा, सुरेश पाटील, तेजस देपुरा, वसीम काझी, पंकज मोमाया, कमलेश तलरेजा, शिरीष थोरात, गिरीश अग्रवाल, राजेश समदाणी, हेमंत परदेशी, सुनील गगडाणी, संजय अमृतकर, विनोद पांडे, अनिल पाटील, ऋषी सोळुंके, संभाजी निंबाळकर, योगेश बारी, केशव नारखेडे, ललित मराठे, अमित भागवाणी आदी उपस्थित होते.