---Advertisement---

गांजा ओढणाऱ्या तरुणांविरुद्ध पोलिसांची कारवाई

by team

---Advertisement---

अमळनेर : पोलिसांनी अनेकवेळा कारवाई करून देखील मोठ्या प्रमाणात गांजा शहरात येत असून तरुणाईला गांजा सेवन चे व्यसन जडले आहे. गांधलीपुरा भागात इदगाह मैदानजवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गांजा सेवन करणाऱ्या चार तरुणांविरुद्ध एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की, काही तरुण गांधलीपुरा भागात इदगाह मैदानजवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गांजा सेवन करीत आहेत. त्यांनी डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे, मिलिंद सोनार, प्रशांत पाटील, विनोद संदानशीव, उज्वल म्हस्के, उदय बोरसे यांच्या पथकाला शहनिशा करण्यासाठी पाठविले. पथकाने याठिकाणी छापा मारला असता जमील उर्फ अय्युब रऊफ पिंजारी( वय २३ रा आययुडीपी कॉलनी तांबेपुरा), अनिस शेख अजीम (वय २९ रा जपान जीन), आवेश शरीफ खाटीक (वय २३ रा तांबेपुरा), शाहरुख खान सलीम खान याना गांजा सेवन करताना पकडले.

यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ च्या कलम ८(क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास विनोद सोनवणे, चंद्रकांत पाटील हे करीत आहेत. काही दिवसांपूर्वी देखील पोलिसांनी तरुणांना गांजा सेवन करताना पकडले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे बिघडलेल्या तरुणाईला आवर घातला जात आहे.पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment