---Advertisement---
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातापूर्वी त्यांच्या काठेवाडीतलं घर, बारामतीतील सहयोग घर आणि विद्या प्रतिष्ठान कडे जात असताना रस्त्यावर अघोरी पूजा आणि बोकड उलटं टांगलं असून अघोरी पूजा करून अजितदादांचा घात केल्याचा खळबळजनक दावा अमोल मिटकरी यांनी ट्विट करत केला आहे.
नाशिक मधलं भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण गाजत असताना राज्यात अनेक भागात भोंदू बाबाचे कारनामे हे समोर येत आहे यावरून राजकारण हे चांगलंच तापलं आहे. यातच अमोल मिटकरी यांनी पुन्हा एक खळबळजनक दावा केला असून अघोरी पूजा आणि अजित पवार यांच्या विमान अपघातांचं कनेक्शन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये अजितदादांच्या काटेवाडीतल्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अघोरी पूजा झाली होती. अशी माहिती अमोल मिटकरी यांना दिली आहे. यासोबतच विद्या प्रतिष्ठान एआय इमारत बांधकामाजवळ मध्यरात्री अघोरी पूजा मांडल्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. ज्या बांधकामाची पाहणी अजित पवार सकाळी करणार होते त्याच्या आदल्या रात्रीच अघोरी पूजा मांडल्याचं बोललं जात आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर करत या अघोरी पूजा बाबतची माहिती व फोटो शेअर केला आहे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडीतील घर आणि विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडलेले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय हे होऊ शकत नाही.’ एकूणच या कालावधीत बारामती मध्ये काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर व प्रसार माध्यमांवर फिरत आहेत डिसेंबर 2025 मध्ये विद्या प्रतिष्ठानच्या या इमारत बांधकामा जवळ मध्यरात्रीच्या सुमारास अघोरी पूजा मांडली गेलेली होती. ज्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी अजितदादा हे सकाळी करणार होते त्याच्या आदल्या रात्रीच ही पूजा मांडल्या गेल्याचं त्यांनी पोस्टद्वारे नमूद केला आहे.
---Advertisement---
सोशल मीडियावर त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय की, 28 डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठानच्या इमारत बांधकामा जवळ मध्यरात्री मांडलेली ही अघोरी पूजा !! अजित दादा सकाळी इथेच इमारत बांधकामाची पाहणी करण्यासाठी येणार होते. #भयावह अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेली आहे आणि यासोबतच त्यांनी अघोरी पूजेचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
अमोल मिटकरी यांनी आणखी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बोकड उलटे टांगून खाली अघोरी पुजा… खताळपट्टा काटेवाडी परिसरात दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलटे टांगून खाली अघोरी पुजा केल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. चार महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं. अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा घात केला? हे भयंकर सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे. #भय इथले संपत नाही.









