भुसावळात अनोखं राजकीय मिलन! राजकारणातील कट्टर विरोधक एकत्र, डिजेच्या तालावर धरला ठेका, सर्वांच्याच भुवया उंचावल्या….!

---Advertisement---

 

भुसावळ शहरात आज एक अनोखं राजकीय मिलन पाहायला मिळालं. सिंधी समाजाच्या चेट्री चंड्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकारणातील कट्टर विरोधक एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी हे दोघेही या कार्यक्रमात उपस्थित होते. भुसावळच्या राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे हे दोन्ही नेते आज मात्र सर्व मतभेद विसरून एकत्र दिसले. चेट्री चंड्र उत्सवाच्या निमित्ताने सिंधी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी उपस्थित राहून डीजेच्या तालावर ठेका धरला, तसेच सिंधी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि जल्लोषातही सहभाग घेतला.

ढोल-ताशांच्या गजरात आणि आनंदाच्या वातावरणात दोन्ही नेते एकत्र दिसल्याने उपस्थितांमध्येही उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी या प्रसंगाला सामाजिक एकतेचं प्रतीक मानलं. दरम्यान, राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले संजय सावकारे आणि संतोष चौधरी एकत्र आल्याने भुसावळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हा केवळ सामाजिक कार्यक्रमाचा भाग होता की यामागे काही वेगळे राजकीय संकेत आहेत, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारा हा प्रसंग सध्या जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---