चाळीसगावात मोठी कारवाई! ३७.७५ लाखांचा सुगंधित गुटखा जप्त; एक जण अटकेत

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. शहर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ तारखेला दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ओझर गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळून आला.

या कारवाईत एकूण ३७ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सुमारे ९६ गोण्या ‘विमल’सह इतर सुगंधित तंबाखूचा समावेश असून अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणात शेहजाद अहमद याकूब मोहम्मद (रा. नवसारी, गुजरात) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.

ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पीएसआय संदीप घुले यांच्या नेतृत्वाखाली योगेश मांडोळे, विकास पाटील, दत्तू सावळे, ज्ञानेश्वर पाटोळे आणि विलास पवार यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

तसेच अन्न व औषध प्रशासन जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोराडे, किशोर साळुंखे आणि वाहन चालक वृषभ चव्हाण यांचाही या कारवाईत सहभाग होता.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संदीप घुले करीत असून, या कारवाईमुळे बेकायदेशीर तंबाखू विक्रीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---