महाराष्ट्रात उद्योगांना मोठा वीज दरवाढीचा धक्का! वीजेच्या दरात वाढ, प्रतियुनिट दर वाढीमुळे खर्च वाढणार?

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी धक्कादायक निर्णय समोर आला आहे. राज्य सरकारने वीज विक्रीवरील करात वाढ करत प्रतियुनिट जवळपास ९.९० पैशांची वाढ लागू केली आहे. ही वाढ १ डिसेंबरपासून अमलात आली असून, उद्योग आणि व्यवसायिकांवर त्याचा थेट आर्थिक परिणाम होणार आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, नव्या दरांनुसार औद्योगिक ग्राहकांना आता प्रतियुनिट २८.९४ पैसे, तर व्यावसायिक ग्राहकांना २७.९० पैसे विक्री कर म्हणून भरावे लागणार आहेत. याआधी हा दर अनुक्रमे १९.०४ पैसे आणि १८.०० पैसे इतका होता.

या निर्णयामुळे आधीच वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करणाऱ्या उद्योगांवर आणखी ताण येणार आहे. वीज हा उद्योगांचा प्रमुख खर्चाचा घटक असल्याने, या वाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर होणार असून, त्याचा परिणाम थेट बाजारातील वस्तू आणि सेवांच्या किंमतींवर दिसू शकतो. या वीज दर वाढीच्या निर्णयामुळे छोट्या-मोठ्या उद्योगांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---