---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला व भाजपाला एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी यश मिळालं, यात भाजपने सर्व 46 पैकी 46 जागांवर विजय मिळवत 100% यश संपादन केलं. जळगाव मनपामध्ये महायुती ने ७५ पैकी ७० जागांवर विजय मिळवित बहुमत मिळविले होते. या मधे भाजपा ने ४६ तर शिवसेनेनं २३ जागा मिळविल्या होत्या,
भाजपला जास्त जागा मिळाल्याने महापौरपद भाजपकडे तर उपमहापौर शिवसेनेकडे दिले जात आहे. राज्यात पहिल्यांदा खेळी मेली मध्ये निर्णय घेतल्या असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. जे पात्र आहेत त्या प्रत्येकाला पुढील काळात संधी देण्यात येईल, त्यामुळे नाराज होऊ नका असा सल्ला ही गिरीश महाजन यांनी यावेळी दिला आहे. जळगाव चा चांगला विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे.
दरम्यान भाजपा सर्वाधिक जागांवर निवडून आल्यामुळे भाजपच्या नवनिर्वाचित बिनविरोध झालेल्या नगरसेविका दीपमाला काळे यांची आज महापौरपदी निवड करण्यात आलेली आहे तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा जळगाव महानगरपालिका वर भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे.
जळगाव शहरातील प्रलंबित विकास काम हे ताबडतोब मार्गी लावण्यासाठी सर्व नगरसेवक हे सर्वोत्तम कामगिरी करताना नावारूपाला येणार आणि शहराचा विकास करणार अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी जळगाव शहरातील जी एम फाउंडेशनच्या कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार मंगेश चव्हाण आमदार सुरेश भोळे यांच्यासह सर्व नगरसेवक व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.









