​डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर; ३० रक्तदात्यांनी दिली ‘रक्तदाना’तून मानवंदना

---Advertisement---

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवाज्ञा बहुउद्देशीय संस्था’तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग घेत मानवंदना दिली.
या सामाजिक उपक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व संदीप गावित यांसह आमदार राजू मामा भोळे, महापौर दीपमाला ताई, उपमहापौर मनोज चौधरी व नगरसेवक निलेश तायडे यांनी भेट देत रक्तदात्यांचे कौतुक केले.


शिबिराची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष विवेक महाजन यांनी सहकाऱ्यांसह डॉ. आंबेडकरांच्या जयघोषाने केली. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत रेड प्लस ब्लड सेंटरच्या पथकाने रक्त संकलन केले.
“डॉ. आंबेडकरांचे विचार कृतीत आणण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे,” असे विवेक महाजन यांनी सांगितले. या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---