सावदा पोलीस ठाण्यात एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल; अरेरावी केल्याचा आरोप

---Advertisement---

 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांशी अर्वाच्च अरेरावी केल्याचा आरोप ठेवत भारतीय न्याय संहितेच्या कलम 296 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावदा पोलीस स्टेशनमध्ये गौण खनिज चोरीच्या प्रकरणासंदर्भात चौकशी करत असताना एकनाथ खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला. याचवेळी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी अर्वाच्च भाषेत बोलत अरेरावी केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर सावदा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मी केवळ गौण खनिज चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. त्या वेळी माझ्या तोंडून अनवधानाने एक चुकीचा शब्द निघाला. त्यानंतर मी संबंधित पोलीस निरीक्षकांची तत्काळ माफी मागितली होती,” असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---