---Advertisement---
जळगाव : “आपले सरकार” या वेबसाईटवर अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता तसेच गोपनियतेचा भंग झाल्याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी नॉन क्रिमीलेयर दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी सेतु सुविधा केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या “आपले सरकार” या अधिकृत वेबसाईटवर २६ फेब्रुवारी रोजी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली. त्यानंतर १३ मार्च रोजी सायंकाळी त्यांना तहसीलदार जळगाव यांच्या नावे एक मेल प्राप्त झाला. खोटे स्वयंघोषणापत्र देऊन तहसीलदार यांच्याकडून पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मिळवल्याप्रकरणी सुनावणीकामी १८
मार्च रोजी हजर राहण्याबाबत त्या मेलमधे नमुद होते.
दरम्यान पाल्यांच्या नॉन क्रिमीलेयर बाबत गुप्ता यांनी सेतू सुविधा केंद्रात चौकशी केली असता संबंधीत अर्ज प्रक्रियेत असल्याचे त्यांना समजले. तसेच सुनावणी प्रकरणी गुप्ता यांनी संबंधीत कागदपत्रांच्या प्रमाणीत प्रती मागवल्या. त्या दस्तावेजामधे त्यांना पाल्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती देखील आढळून आल्या. हा प्रकार त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
मुलीच्या शासनाच्या अधिकृत वेब साईटवर आपली शैक्षणीक कागदपत्रे अपलोड केली असतांना ती शैलेंद्र सपकाळे नामक व्यक्तीकडे गेल्याचे गुप्ता व त्यांची मुलगी या दोघांच्या लक्षात आले. याप्रकरणी गुप्ता यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात शैलेंद्र सपकाळे व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.









