मोठी बातमी : ईडीच्या जाळ्यातून न्यायालयाच्या माध्यमातून रोहित पवारांची सुटका; ‘घायल हूँ इसलिए घातक हूँ’ म्हणत दिला इशारा

---Advertisement---

 

मुंबई / महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईतून त्यांची सुटका झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

२०१९ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणात सहकारी साखर कारखाने कमी किमतीत खासगी कंपन्यांना विकल्याचा आरोप होता. या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालय (ED) ने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) कारवाई करत रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती ॲग्रो कंपनीची ५० कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली होती. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील जमीन, साखर कारखाना आणि यंत्रसामग्रीचा समावेश होता.



न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत “न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास होता आणि आहे. अखेर सत्याचा विजय झाला,” असे म्हटले.
विरोधकांना सूचक इशारा
कारवाईतून मुक्त होताच त्यांनी आक्रमक भूमिका घेत “या प्रकरणामुळे मला नाहक त्रास सहन करावा लागला. ‘घायल हूँ, इसलिए घातक हूँ’,” असे म्हणत विरोधकांना सूचक इशारा दिला.
या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---