अमळनेर : हिंदू तरुणींची छेड व अत्याचाराचे प्रकार वाढीस आले आहेत. शहरासह ग्रामीण भागात देखील हे प्रकार वाढीस आले आहेत. अशात अमळनेर तालुक्यातील एकलहरे गावांत हिंदू तरुणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी एका विरोधात मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढली. या प्रकाराने संतप्त गावकरी व हिंदू संघटनांनी आरोपीची मजबूत धुलाई केली. ही घटना १ जून रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली. एकलहरे गावात एका घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामांच्या ठिकाणी समीर अक्रम अली खान(वय २२ रा. अमळनेर) हा मिस्तरीचे काम करीत आहे. त्याने गल्लीतील अल्पवयीन मुलीकडून पिण्यास पाणी मागितले. त्यानंतर त्याने घरात घुसून मुलीचा हात पकडला व आपण उद्या पळून जाऊ असे तिला सांगत त्याचा मोबाईल नंबर दिला. फोन करेल तेव्हा आपण पळून जाऊ असे सांगत त्याने ही गोष्ट कोणाला सांगितल्यास मुलीला व तिच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली.
मुलीने आई- वडिलांना ही सर्व हकीकत सांगितली. गावात ही वार्ता पसरताच ग्रामस्थ एकत्र आले. यानंतर त्याला चोप दिला. ही बाब बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी देखील घटनास्थळी हजेरी लावली होती. या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४ , ३२९(४) , ३५१(२) पोक्सो कायदा कलम १२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.