---Advertisement---
दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे हद्दीत हनुमान वस्ती, काळे वस्तीजवळ एका नऊ वर्षाच्या मुलीने तिच्या भावाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग मनात धरून जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्या मुलीची लाकडे कापण्याची मशीन गळ्यावर, डोक्यावर फिरवून हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 मे 2026 रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास देउळगाव राजे गावचे हददीत हनुमान वस्ती, काळे वस्तीजवळ आरोपीचे राहत्या घरात ही घटना घडली आहे.
अनामिका शांताराम चव्हाण असं मृत ९ वर्षीय मुलीचं नाव आहे. यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शांताराम दुर्याेधन चव्हाण व चिंगु शिंदबाद भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 मे 2026 रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास आरोपी शांताराम दुर्याेधन चव्हाण याने त्याची नऊ वर्षाची मुलगी अनामिका हिने तिचा भाऊ संस्कार शांताराम चव्हाण याच्या शाळेच्या गुणपत्रीकेवर खाडाखोड केली.याचा राग मनात धरून मुलगी अनामिका शांताराम चव्हाण हिचे गळ्यावर डोक्यावर पाठीमागे व गालावर लाकडे कापण्याची मशीन चालू करून फिरवली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मामूलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घर पेटवून दिले.
यावेळी आरोपी सोबत असणारी महिला चिंगु शिंदबाद भोसले हिने देखील सदरची घटना कोणालाही सांगू नको असे सांगून घटनेची माहिती पाोलीसांपासून लपवून ठेवली. याची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी स्वतःहून पोलीस शिपाई निलेश फडणीस यांच्या फिर्यादीवरून दोघांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा अधिक सत्ता तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करीत आहेत.









