---Advertisement---
जळगाव महानगरपालिकेच्या 17 व्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे ह्या प्रथम नागरिक अर्थात महापौर झाल्या आहे. महापालिकेच्या 17 मजली इमारतीच्या 17 व्या महापौरपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे यासह शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाली आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी महापालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. आणि या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे हे होते आणि त्यांच्या देखरेखी खाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश हे संपादन करण्यात आलं आणि यात भाजपला 46 पैकी 46 जागांवर त्यांचे बहुमत मिळवता आलं, यासह शिवसेना शिंदे गटाने 23 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपच्या दीपमाला काळे या महापौर पदासाठी आणि शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी हे उपमहापौर पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केले होते. आज 11 वाजेच्या सुमारास अर्जांची छाननी ही केली गेली. आणि विशेष म्हणजे या दोन्ही पदासाठी इतर कोणत्याही पक्षाकडून अर्ज प्राप्त झाले नव्हते त्यामुळे या दोघांचीही उमेदवारी बिनविरोध झाली आहे.

महापौर पदासाठी दीपमाला काळे यांनी खबरदारी म्हणून दोन अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यांना या छाननी दरम्यान एक जास्तीचा भरलेला अर्ज हा मागे घ्यावा लागला. ही प्रक्रिया पूर्ण होतातच पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रोहन घुगे हे नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे.
---Advertisement---
जळगाव महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाला पहिल्यांदा उपमहापौर पद मिळालं आहे या आधी जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर होत्या तर कुलभूषण पाटील हे उपमहापौर होते आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट तयार झाल्यानंतर ते उद्धवसेनेतच राहिले त्यामुळे आता शिंदे गटाला पहिल्यांदा उपमहापौर पद हे मिळणार आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी 17 सप्टेंबर 2023 रोजी महापालिकेचा कार्यकाळ हा संपुष्टात आला होता शेवटच्या महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील हे होते तेव्हापासून पालिकेवर प्रशासक राज होतं आणि आता 28 महिने 19 दिवसानंतर पुन्हा पदाधिकारी हे रुजू होणार आहेत.
जळगाव महापालिकेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंतचे महापौर कोण होते, वाचा….
1.आशाताई दिलीप कोल्हे
2.तनुजा अजित तडवी
3.रमेशदादा भिकमचंद जैन
4.प्रदीप ग्यानचंद रायसोनी
5.अशोक काशिनाथ सपकाळे
6.सदाशिव गणपत ढेकळे
7.विष्णू रामदास भंगाळे
8.जयश्री अशोक धांडे
9.किशोर काशिनाथ पाटील
10.राखी शामकांत सोनवणे
11.नितीन बालमुकुंद लढ्ढा
12.ललित विजय कोल्हे
13.गणेश बुधो सोनवणे
14.सीमा सुरेश भोळे
15.भारती कैलास सोनवणे
16.जयश्री सुनील महाजन
17.दीपमाला मनोज काळे
आतापर्यंत एकूण 8 पुरुषांनी आणि 8 महिलांनी महापौर पद हे भूषवलं आहे. आता नवव्या महिला महापौरपदी दीपमाला काळे या विराजमान झाल्या आहेत.









