---Advertisement---
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयीत गोकुळ चव्हाण याच्या विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर 2025 या महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याने सदर महिलेला केवायसी करण्याचा सल्ला हा देण्यात आला होता. याबाबत संशयित गोकुळ चव्हाण याला माहिती मिळताच त्याने महिलेच्या घरी जाऊन केवायसी करून देतो. मात्र त्या बदल्यात त्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा फिर्यादीत पीडित महिलेचा आरोप आहे. महिलेने सदर प्रकार आपल्या पतीला सांगितला व महिलेच्या पतीनेही गोकुळ चव्हाण याला पुन्हा आपल्या परिसरात न येण्याची तंबी दिली असतानाही गोकुळ चव्हाण हा महिलेचा सतत पाठलाग करत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.
जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित गोकुळ चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर 2025 या महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याने सदर महिलेला केवायसी करण्याचा सल्ला हा देण्यात आला होता. याबाबत संशयित गोकुळ चव्हाण याला माहिती मिळताच त्यांनी महिलेच्या घरी जाऊन केवायसी करून देतो असे सांगत. मात्र त्या बदल्यात त्यांनी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेने फिर्यादित केला आहे. दरम्यान सदर प्रकार हा पतीला सांगितल्यानंतर महिलेच्या पतीने गोकुळ चव्हाण याला परिसरात न येण्याची तंबी ही दिली पण तरी देखील संशयित रमेश चव्हाण हा महिलेचा सतत पाठलाग करत महिलेवर पाळत ठेवत असल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांकडून सखोल तपास केला आहे.









