---Advertisement---
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाला. राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत भावपूर्ण अभिवादन केले.
कार्यकर्ते व नागरिकांसाठी दुपारपर्यंत अस्थिकलश राष्ट्रवादी कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणात अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. अस्थिकलश दर्शनावेळी उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भावूक झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांना अश्रू अनावर झाले.









